Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी: परमबिर सिंगांवर तेलगी घोटाळा शेकणार!

मोठी बातमी: परमबिर सिंगांवर तेलगी घोटाळा शेकणार!

parambir-singh- telgi-matter-thane-mumbai-news-updates
parambir-singh- telgi-matter-thane-mumbai-news-updates

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेले परमबिर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. गृहमंत्र्यांवर लेटरबाँम्ब टाकल्यानंतर स्वत: परमबिर सिंग यांच्यावर हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरण शेकले जाणार अशी माहिती समोर येत आहे.

ठाणे-मुंबई परिसरात १९९९ मध्ये एका टोळीकडून पोस्टाची बनावट तिकिटे विकली जात होती. याची माहिती संबंधित अधिका-याला मिळाली होती. त्या अधिका-याने त्यावेळी आपला जीव धोक्यात घालून वेशांतर केले आणि १५ दिवस टोळीची पुराव्यासहित माहिती मिळवली होती. नंतर २१ ऑगस्ट १९९९ ला या अधिका-याने मीरारोड पोलीस चौकीतील एक अधिकारी आणि सहाका-यांसह छापा घालून फुलचंद जैन या आरोपीला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून २१ हजारांची बनावट पोस्टाची तिकिटे, महसूल तिकिटे रोखे हस्तांतरासाठी वापरली जाणारी तिकिटे जप्त केली होती.

हेही वाचा: अनिल देशमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अभय; राजीनामा घेणार नाही!

तेलगी घोटाळ्याचा तो पहिला एफआयर मीरारोड चौकीत CR No. 274/ 1999 नोंदवला होता. त्यानंतर पुढच्या चार दिवसात अनुक्रमे उमेश खंडेलवाल जव्हेरी बाजार आणि भाऊसाहेब जगदाळे जीपीओ,व्हीटी मुंबईला पकडले. जगदाळे हा पोस्टाचा कर्मचारी होता. त्याच्याकडे तिकीट विक्रीचे काऊंटर होते. तो तेलगीर्निमीत अर्धी बनावट तिकीटे विकायचा अन् अर्धी तिकीटे पोस्टाची विकायचा. बनावट तिकीटांच्या विक्रीची रक्कम नंतर या रॅकेटमधील आरोपी वाटून घ्यायचे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पत्र लिहून गंभीर आरोप करणारे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) नवनिर्वाचित प्रमुख परमबीर सिंह अखेर समोर आले आहेत. त्यांनी आज सोमवारी होमगार्डच्या मुख्यालयात जाऊन पदभार स्वीकारला. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी गंभीर चुका केल्याचे वक्तव्य केल्यानंतर परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली होती.

जगदाळेने पुन्हा काही महत्वाची माहिती दिली. नंतर या रॅकेटमधील आरोपी वाटून घ्यायचे. जगदाळेने पुन्हा काही महत्वाची माहिती दिली. त्यावरून विजय कदम याला शिवडीत अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी तिकीटांना पाडल्या जाण-या छिद्राची ज्यातून तिकीट फाडून वेगळे केले जाते.

मशीन आणि मोठ्या प्रमाणात बनावट तिकिटे जप्त करण्यात आली. उदय सावंत हा अलगद कचाट्यात सापडला. त्याला याच अधिका-यांनी २५ ऑगस्ट १९९९ ला कुलाब्यातील मिंट रोडवर असलेल्या अक्षर मुद्रणालय येथे छापा घातला. सुमारे ९८ लाखांची बनावट तिकिटे,मुद्रांक पोलिसांना सापडले. त्यामुळे अक्षर मुद्रणालयाला सील लावण्याचा निर्णय ही कारवाई करणा-या पोलीस अधिका-यांनी घेतला. नंतर काही कारस्थानं घडले होते.

हेही वाचा: उचलबांगडी नंतर परमबीर सिंग यांनी आज गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारला  

तत्कलीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी संबंधित अधिका-याला सील लावण्याची गरज नाही. तुम्ही निघून या, असे म्हटले. अधिका-यांच्या मते त्यावेळी ठाणे ग्रामिणला पोलीस अधिक्षक म्हणून परमबिर सिंग होते. त्यांच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी म्हणून पाटील ओळखले जात होते. पुढे या प्रकरणात  अनेक घडामोडी घडल्या आणि ही कारवाई करणा-या अधिका-याची बदली करुन त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला.

तेलगी आणि साथीदारांना वाचविण्यासाठीच झाला होता. तो परमबिर सिंगाच्या इशा-यावरून झाला होता. या अधिका-याचा दावा आहे. त्याला तब्बल २१ वर्ष झाली. अन् परमबिर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोपानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. पोलिसांमध्ये भिन्न मतप्रवाहही पुढे आले आहेत. तेलगी घोटाळ्याचा छळा लावणा-या अधिका-यांच्याही भावना तीव्र झाल्या. या पार्श्वभूमीवर, जुने सर्व रेकॉर्ड काडून संबंधित अधिकारी सुमारे ६० हजार कोटींच्या घोटाळ्यातील तेलगी प्रकरण बाहेर काढणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments