Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

अखेर सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

Sachin Vaze suspended by Mumbai police
Sachin Vaze suspended by Mumbai police

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या (NIA) कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता.

सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी  संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती.

त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. अशाही चर्चा सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments