Friday, December 27, 2024
Homeदेशप्रियंका गांधींची ‘चाय की बात’; थेट मळ्यात जाऊन चहाच्या पानांची तोडणी;पाहा Video

प्रियंका गांधींची ‘चाय की बात’; थेट मळ्यात जाऊन चहाच्या पानांची तोडणी;पाहा Video

assam-congress-general-secretary-priyanka-gandhi-plucks-tea-leaves-with-workers-at-sadhuru-tea-garden
assam-congress-general-secretary-priyanka-gandhi-plucks-tea-leaves-with-workers-at-sadhuru-tea-garden

आसाम: आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्राचाराचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या सध्या आसामच्या दौ-यावर आहेत. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा या सोमवारपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्यांनी सधारु टी स्टेट या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली. दर निवडणुकीला येथील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात. आजच प्रियंका यांची तेजपूरमध्ये एक प्रचारसभाही होणार आहे.

#WATCH Assam: Congress General Secretary Priyanka Gandhi Vadra plucks tea leaves with other workers at Sadhuru tea garden, Biswanath. pic.twitter.com/8jpQD8IHma

— ANI (@ANI) March 2, 2021

प्रियंका यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारी प्रियंका यांनी कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पूजा करुन दौऱ्याला सुरुवात ेकली होती. आसाममध्ये १२६ सदस्यांची विधानसभा असून येथे २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

Smt. @priyankagandhi joins tea workers at Sadhuru tea garden and tries her hand at plucking tea leaves. pic.twitter.com/3qFtbGkESF

— Congress (@INCIndia) March 2, 2021

सोमवारी प्रियंका या सर्वात आधी जलुकबारी परिसरामध्ये थांबल्या. येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. त्यानंतर त्या नीलाचल हिल्स येथील शक्तिपीठाकडे रवाना झाल्या. यावेळी प्रियंका यांनी, “मागील बऱ्याच काळापासून मला या मंदिराला भेट द्यायची होती, आज अखेर ती इच्छा पूर्ण झाली. मी स्वत:च्या कुटुंबाबरोबरच आसामी लोकांच्या भल्यासाठी प्रार्थना केली,” असं म्हटलं होतं.

कामाख्ये वरदे देवि नीलपर्वतवासिनि।
त्वं देवि जगतां मातर्योनिमुद्रे नमोऽस्तु तेII

অসম আৰু অসমীয়াৰ কুশল কামনা কৰি মা কামাখ্যাৰ শ্রীচৰণত সেৱা আগবঢ়ালো

आज मां कामाख्या के दर्शन का सौभाग्य मिला। मां कामाख्या से समस्त देशवासियों के कल्याण के लिए प्रार्थना की। pic.twitter.com/jkWgu7JpLs

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 1, 2021

विधानसभा निवडणुकींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता प्रियंका यांनी पत्रकारांना राजकारणाबद्दल नंतर बोलूयात असं सांगितलं. “मी इथे देवाचे आभार मानन्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी आले आहे. देवाने मला भरपूर गोष्टी दिल्यात,” असं प्रियंका म्हणाल्या. फेसबुकवरही त्यांनी कामाख्या मंदिरातील दर्शनाचे फोटो पोस्ट केले होते. हे विशेष.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments